कृषी संस्कृती हा गट शेती(community farming ) आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन (supply chain management) startup आहे. विभक्त कु टुंब पद्धतीमुळे जमिनीचे झालेले विभाजन, पारंपारिक शेतीच्या मर्यादा , रासायनिक खतांचा अतिवापर आणि त्यामुळे पसरलेले कँसर सारखे आजार,जमिनीचा गेलेला पोत,शेतीसाठी मनुष्यबळाचा अभाव , नैसर्गिक आपत्ती, अनिश्चित बाजारभाव या सर्व शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यासमोरच्या मुख्य समस्या आहेत. भविष्यातील शेतमालाच्या मागणी आणि पुरवठा यातील अंतर लक्षात घेता आणि गेल्या काही वर्षातील रासायनिक खताच्या अतिवापराचे दुष्परिणाम पाहता शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि शास्त्रीय पर्याय उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्याला थेट तज्ञ आणि बाजाराशी जोडून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे त्यामुळेच ,विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला एकत्र आणून तज्ञ सल्ल्याने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत शेतमालाची गुणवत्ता वाढवणे आणि तो माल अंतिम ग्राहकापर्यंत गुणवत्ता प्रमाणीकरणासह पोहोचवणे हे कृषी संस्कृती चे मुख्य उद्दिष्ट आहे
Developed & Managed By Thirsty Maart 2024 | All Rights Reserved